रोप पद्धतीने ऊस लागण करणे अधिक फायदेशीर:


1. ऊसाचे प्रति एकरी उत्पादन वाढविणेसाठी ऊसाची संख्या आणि प्रत्येक ऊसाचे वजन वाढविणे गरजेचे आहे.
2. ऊसाची एकरी संख्या कमीत कमी 43,000 मिळविणे आवश्यक आहे. ही संख्या मिळविण्यासाठी ऊसाची ऊगवण 98% ते 100% व फुटव्यांची एकसारखी वाढ होणे गरजेचे आहे.
3. ऊसाच्या शेतामध्ये 100% उगवण नेहमीच्या कांडी लागण पध्दतीमध्ये मिळत नाही. म्हणून एक डोळ्याची ऊसाची रोप ट्रेमध्ये तयार केलेली रोपे शेतात लावल्यास शेतामध्ये 98% ते 100% जगतात.
4. यामुळे सर्व रोपांना सूर्यप्रकाश, हवा, अन्न आणि पाणी व्यवस्थित मिळते आणि त्यामुळे फुटव्यांचे प्रमाण वाढते.
5. नियोजनबध्द व योग्य अंतरावर रोप लागण केल्यामुळे एकरी ऊसांची संख्या मर्यादित राखता येते त्यामुळे ऊसाचे वजन व प्रतवारी वाढते.
6. रोप लागणीमुळे पारंपारीक पध्दतीपेक्षा एक महीना कालावधी वाढतो. त्यामुळे एक महिना जमिन मशागतीस किंवा जमिनीला विश्रांती देता येते. व त्यावरील व्यवस्थापन खर्चामध्ये बचत करता येते.
7. रोप लागणीमुळे ऊस फुटव्यांची संख्या योग्य प्रमाणात राखता आल्यामुळे फुटवे एक समान व जोमदार वाढतात त्यामुळे मरीचे प्रमाण अत्यल्प रहाते.
8. वरील सर्व नियोजनामुळे उत्पन्नात 15% अधिक वाढ मिळू शकते.
9. रोप पुनर्लागवडीपर्यंत एक ते दिड महिना ऊसाचे शेत मशागतीसाठी किंवा अवधीच्या पिकासाठी वापरता येते.

उपलब्ध उसाचे वाण


CO-86032

को ८६०३२- हि जात आडसाली साठी १५८.५४ टन/हे. अपादन व साखर उतारा २२.४२ पूर्वहंगामासाठी १३८.३९ साखर उतारा २०७१ तसेच हंगामासाठी १०५ टन/हे व साखर उतारा १४.४४ इतकी उत्पादन क्षमता या वाणात आहे. हि जात उशिरा पक्व होणारी असून ऊस व साखरेचे उत्पादन चांगले देते. तीन हंगामासाठी शिफारस असून जास्त फुटचे, उशिरा तुरा घेतो. खोडवा चांगला येत असून काणी रोगास मध्यम प्रतिकारक आहे.


CO-92005

को ९२००५ (फुले ९२००६)- हे वाण पूर्व हंगाम व सुरु हंगाम लागवडीसाठी असून ऊस उत्पादन १६८६९ ट/ आणि साखर उतारा १८.२९ टन/ है. इनके देते. हे वाण लवकर पक्व होणारे असून गुळ उत्पादनासाठी चांगला आहे. या जातीस तुरा येत नसल्यामुळे पावसाच्या भागात लागवड करणे फायदेशीर ठरते पण हि जात पानांवरील ठिपके रोगास बळी पडते.


CO-0265

कोएम ०२६५ (फुले २६५) या वाणाचे उत्पादन आडसाली हंगामासाठी १९९.८५ टन/ हे. व साखर उतारा २६.८२ इनके असून पूर्वहंगामासाठी १६४.४० व साखर उतारा २२ ५३ इतक्या प्रमाणात देत असून हि जात तीनही हंगामासाठी शिफारस करण्यात आली आहे. या जातीचा ऊस मध्यम जाड असून उसाची संख्या जादा असल्याने उत्पादन जादा मिळते. खारवट, चोपण जमिनीत चांगला प्रतिसाद देत असून खोडवा चांगला येतो. कांड्या मध्यम जाड असून मध्यभागी फुगीर व टोकास निमुळते असतात..


VSI-03102

व्ही एस आय ०३१०२- हा वाण १४९.५८ टन साखर उतारा २२.५० इतका देत असून अती पर्जन्य भागासाठी पूर्वहंगाम सुरु लागवडीसाठी शिफारस करण्यात आले आहे. जास्त पाण्याचा ताण सहन करत असून उशिरा तुरा येतो. तांबेरा रोगास मध्यम प्रतिकारक आहे.


VSI-08005

व्ही एस आय ०८००५ वाणाचे ऊस उत्पादन १४४.६४ टन/हे. व साखर उता प्रामण २१.२३ टन/हे. या वाणाचा खोडवा चांगला येत असून पाण्याचा ताण सहन करते, काही किडीय कमी प्रमाणात बळी जात असून काणी व तांबेरा रोगास मध्यम प्रतिकारक आहे. ऊसास दशी पडत नसून तुरा कमी प्रमाणात येतो


MS-10001

एम एस १०००१ (फुले १०००१) हे वाण पूर्वहंगाम व सुरु लागवडीसाठी शिफारस केले असून १४०.९० टन इसके उत्पादन २०.२५ टन/ हे. साखर उताऱ्याचे प्रमाण आहे. हा वाण खारवट चोपण जमिनीत चांगला येतो... ऊस जाड असून रंगाने हिरवट पिवळसर आहे. व त्यावर घोडे मेणाचे प्रमाण

इतर उपलब्ध उसाचे वाण

 

  1. 1. COM-9057
  2. 2. 5002
  3. 3. 1234 (Siddhigiri)



रोप लागण पध्दत व घ्यावयाची काळजी:

 

  1. 1. रोप लागणीसाठी सरीमधील अंतर हे 3 फुटापेक्षा जास्त (4.5) किंवा त्यापेक्षा जास्त असावे.
  2. 2. रोप लागणीपूर्वी बेसल डोस सरीमध्ये देणे. कोरड्या जमीनीमध्ये रोप लागण करू नये. ट्रे मधून रोप काढलेपासून 5 ते 10 मिनिटामध्ये पुरेशी ओल असतेवेळी लागण करावी. रोपे सरीवर जास्त काळ अजिबात ठेवू नयेत.
  3. 3. रोप ट्रे मधून काढलेनंतर कमीत कमी वेळेत जमीनीमध्ये पुनर्लागण करावे.
  4. 4. दोन रोपातील अंतर दोन फूट असावे.
  5. 5. जमिनीत रोप लागण करते वेळी पाण्यासोबत करावयाचे असल्यास सरी पूर्ण भिजले नंतर पाणी बंद करून रोप लावावे.
  6. 6. किंवा अगोदर एक दिवस पाणी पाजून नंतर खुरप्याने किंवा कुदळीने योग्य खड्डा करून रोप लावावे व लगेच हलक पाणी द्यावे.
  7. 7. कोरड्या जमिनीमध्ये रोप लावण करू नये.
  8. 8. ठिबक असलेस आधी पुरेशी ओल करून रोपे लावावीत व परत पाणी चालू करणे.
  9. 9. बेसल डोस दिला नसलेस तिसऱ्या पाण्याच्या पाळी अगोदर रोपाच्या पाठीमागे 6 ते 7 इंच अंतरावर खुरप्याने खड्डा घेवून माती आड करणे.
  10. 10. रासायनिक खतांची पहिली मात्रा खाली दिलेप्रमाणे रोप लागणीपूर्वी जमिन कोरडी असताना ( पाणी देणे पूर्वी) किंवा रोप लागण झालेनंतर अमोनच्या पाण्यापूर्वी प्रत्येक रोपाच्या मागे सरीमध्ये 5 ते 6 इंच अंतर ठेवून खुरप्याने माती आड करणे व पाणी देणे.
  11. 11. लागणीनंतर 20 ते 25 दिवसानंतर तूट आळी भरून घ्यावी, आणि शक्य असल्यास दुसरी आळवणी म्हणजे ड्रेंचिंग करावं आणि जमीन तन विरहीत ठेवावी.
  12. 12. लागणीनंतर  35 ते 40 दिवसांनी टॉनिक फवारणी करतेवेळी खोड आळी साठी किंवा रस शोषक किडी साठी योग्य ते  कीटकनाशक टॉनिक सोबत वापरावं.
  13. 13. लागणीनंतर  45 ते 50 दिवसानंतर गवताळ वाड आढळल्यास रोप मुळासहित उपटून नष्ट करावे,रोगट रोपांची टक्केवारी 15 टक्क्यांपेक्षा जास्त असल्यास रोपवाटिका व्यवस्थापनास तशी कल्पना द्यावी.
  14. 14. लागणीनंतर  60 ते 70 दिवसानंतर चार्टनुसार खताचा डोस देवून बाळ भरणी करावी, रोपाच्या वर दोन इंच भर होईल इतकी भर घालावी
  15. 15. लागणीनंतर  80 ते 90 दिवसांनी टॉनिक  सोबत रस शोषक किडी साठी  योग्य त्या कीटकनाशकाची फवारणी करावी.
  16. 16. लागणीनंतर  100 ते 120 दिवसांनी चार्टनुसार खताचा डोस खताचा डोस देऊन मोठी बांधणी म्हणजे भरणी करावी आणि पाण्याचा ताण बसू देऊ नये. पुढील काळातील हुमणीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मेटाराईझम जिवाणू भरणीपूर्वी  शेतामध्ये विस्कटून घ्यावं.
  17. 17. मे अखेर योग्य तो आणि योग्य प्रमाणात मिरगी डोस म्हणजेच अमोनियम सल्फेट आणि पोटॅश देण्यात यावा.
    प्रति एकर 80 टन किंवा त्याहून अधिक उत्पन्न अपेक्षित असलेस लागण अड सालीची असणे व वरील खत मात्रेत किमान 25% खत मात्रा अधिक देणे गरजेचे आहे.

    शेणखत व हिरवळीच्या खताचा वापर आपल्या सोयीनुसार करावा.

ट्रेमधील रोप लागण पध्दतीचा वापर खालील प्रकारे करता येते:

 

  1. 1. पूर्व हंगामी व सुरू लागणीसाठी.
  2. 2. खोडवा पिकात नांग्या भरण्यासाठी.
  3. 3. कमी कालावधीत ऊसाचे पिक घेण्यासाठी.

आमची खास वैशिष्ठे




अनुवंशिक शुध्दता

• सरकारी ऊस संशोधन केंद्रातून पायाभूत (फौंडेशन) बेणे . आणून ऊस बेणेचे स्वतः प्लॉट तयार करतो.

• रोपे आमच्या स्वतःच्या बेणे प्लॉटमधील ऊसाच्या बेणेपासून तयार केली जातात.

प्रशिक्षित सहकारी वर्ग

• विक्री अगोदर व विक्री पश्चात उच्च दर्जाची तत्पर तांत्रिक सेवा.

• ऊस पीक व्यवस्थापनासाठी मोफत मार्गदर्शन.


गुणवत्ता आणि दर्जा

किड व रोगाच्या निर्मूलनासाठी ऊसाचे बेणे, डोळा व रोपे यांच्यासाठी किडनाशक व बुरशीनाशकाचा शास्त्रोक्त वापर.

विश्वासनीय वितरण सेवा

• गुणवत्ताप्रधान रोपे, सुनियोजित वेळेवर पोहोच.

• वाजवी किंमत.