रोप पद्धतीने ऊस लागण करणे अधिक फायदेशीर:
1. ऊसाचे प्रति एकरी उत्पादन वाढविणेसाठी ऊसाची संख्या आणि प्रत्येक ऊसाचे वजन वाढविणे गरजेचे आहे.
2. ऊसाची एकरी संख्या कमीत कमी 43,000 मिळविणे आवश्यक आहे. ही संख्या मिळविण्यासाठी ऊसाची ऊगवण 98% ते 100% व फुटव्यांची एकसारखी वाढ होणे गरजेचे आहे.
3. ऊसाच्या शेतामध्ये 100% उगवण नेहमीच्या कांडी लागण पध्दतीमध्ये मिळत नाही. म्हणून एक डोळ्याची ऊसाची रोप ट्रेमध्ये तयार केलेली रोपे शेतात लावल्यास शेतामध्ये 98% ते 100% जगतात.
4. यामुळे सर्व रोपांना सूर्यप्रकाश, हवा, अन्न आणि पाणी व्यवस्थित मिळते आणि त्यामुळे फुटव्यांचे प्रमाण वाढते.
5. नियोजनबध्द व योग्य अंतरावर रोप लागण केल्यामुळे एकरी ऊसांची संख्या मर्यादित राखता येते त्यामुळे ऊसाचे वजन व प्रतवारी वाढते.
6. रोप लागणीमुळे पारंपारीक पध्दतीपेक्षा एक महीना कालावधी वाढतो. त्यामुळे एक महिना जमिन मशागतीस किंवा जमिनीला विश्रांती देता येते. व त्यावरील व्यवस्थापन खर्चामध्ये बचत करता येते.
7. रोप लागणीमुळे ऊस फुटव्यांची संख्या योग्य प्रमाणात राखता आल्यामुळे फुटवे एक समान व जोमदार वाढतात त्यामुळे मरीचे प्रमाण अत्यल्प रहाते.
8. वरील सर्व नियोजनामुळे उत्पन्नात 15% अधिक वाढ मिळू शकते.
9. रोप पुनर्लागवडीपर्यंत एक ते दिड महिना ऊसाचे शेत मशागतीसाठी किंवा अवधीच्या पिकासाठी वापरता येते.